‘इपितर’ चित्रपटाचे फस्ट लूक पोस्टर झाले लाँच

श्रुती के 
साधी माणसं, ग्रामीण बाजाची भाषा आणि सशक्त कथानक हा चांगल्या मराठी सिनेमाचा गाभा मानला जातो. आणि असाचं एक सिनेमा जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचं नाव आहे इपितर. इपितर सिनेमाचं फस्ट लूक पोस्टर नुकतंच लाँच झालं आहे.
 डॉ. सोनाली पाटील रॉय आणि डॉ. संदिप सत्यदेव रॉय प्रस्तुत इपितर सिनेमाची निर्मिती नितिन कोल्हापूरे आणि किरण बेरड ह्यांनी केली आहे.  ह्या विनोदी सिनेमात भारत गणेशपुरे ,मिलिंद शिंदेप्रकाश धोत्रे ,जयेश चव्हाण ,विजय गीते ,गणेश खाडे,निकिता सुखदेववृंदा बाळ ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत.
चित्रपटाचे निर्माते आणि लेखक किरण बेरड सिनेमाविषयी सांगतात, इपितर हा टिपीकल गावाकडला शब्द आहे. इरसाल, बिलंदर ह्या अर्थाने त्याचा वापर केला जातो. अशाच तीन इरसाल मुलांची कथा तुम्हांला इपितर सिनेमातून दिसणार आहे. विनोदी ढंगाने जाताना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्नही आम्ही केलेला आहे.
डॉ. सोनाली पाटील रॉय आणि डॉ. संदिप सत्यदेव रॉय प्रस्तुतनितिन कोल्हापूरे आणि किरण बेरड निर्मित आणि दत्ता तारडे दिग्दर्शित इपितर 8 जून 2018 ला रिलीज होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

सभी माओं को सुष्मिता सेन का संदेश: अब 'हाँ' अधिक बार कहिये

World’s 1st Tech-Enabled Courier Papers N Parcels Launched by 13-year-old Tilak Mehta

Virtusa Designated a Premier Tier Consulting Partner in Amazon Web Services Partner Network