सोनम कपूरच्या लग्नाविषयीच्या चर्चेमूळे ती बनली सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी

by Shrutee K/DNS
बॉलीवूडची स्टाइल आयकॉन सोनम कपूर लवकरच विवाहबध्द होणार आहे. बिजनेसमॅन आनंद अहुजाशी थाटामाटात होणा-या तिच्या लग्नसोहळ्याची उत्सुकता सर्वत्र आहे. तसेच नुकताच तिच्या आगामी सिनेमाचा ट्रेलरही लाँच झाला होता. त्यामूळेच गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत राहिलेली सोनम कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्स वर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनलेली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या तीन आठवड्यांपासून स्कोर ट्रेंड्सच्या लोकप्रियतेच्या चार्टवर नंबर वन स्थानी असलेल्या ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राला ह्या आठवड्यात सोनम कपूरने मागे टाकले आहे.  
बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या स्कोर ट्रेंड्सच्या लिस्टमध्ये बीग बी अमिताभ बच्चन ह्या आठवड्यात 70.68 अंकांनी प्रथम स्थानी आहेत. तर दूस-या स्थानावर सलमान खान आणि तिस-या क्रमांकावर संजू चित्रपटाच्या लोकप्रियतेमूळे रणबीर कपूर आहे.
अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिलेली आहे.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्विनी कौल ह्याविषयी सांगतातसोनम कपूरच्या वीरे दे वेडिंग फिल्मचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुकट्विटर,व्हायरल न्यूजप्रिंट प्रकाशन आणि डिजिटल प्लैटफॉर्मवर सोनम कपूरच्या लग्नाच्या विषयी ब-याच बातम्या होत्या. ह्याचमूळे सोनम कपूर 80.92 अंकांनी बॉलीवूडमधली सर्वाधिक चर्चिली गेलेली आणि लोकप्रिय अभिनेत्री ठरलीय.
आकडेवारीनूसार, 61.32 अंकांनी प्रियंका चोप्रा दूस-या स्थानी तर 59.43 अंकांनी दीपिका पदूकोण तिस-या स्थानावर आहे.
अश्वनी कौल  म्हणतात, "फेसबुकट्विटर, मुद्रित प्रकाशनेसोशल मीडियावरील व्हायरल न्यूजब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश ही आकडेवारी काढताना होतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.” अश्वनी कौल पूढे  सांगतात, आम्ही 14 भारतीय भाषांमधल्या 600 बातम्यांच्या स्रोताव्दारे हा डेटा एकत्र केला आहे. मीडियामध्ये उपलब्ध आकडेवारीनुसारहा डेटा मिळतो."

Comments

Popular posts from this blog

सभी माओं को सुष्मिता सेन का संदेश: अब 'हाँ' अधिक बार कहिये

World’s 1st Tech-Enabled Courier Papers N Parcels Launched by 13-year-old Tilak Mehta

Virtusa Designated a Premier Tier Consulting Partner in Amazon Web Services Partner Network