रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, अनिकेत विश्वासराव, प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीत रंगला ‘अविका एंटरटेन्मेंट’च्या सौंदर्य स्पर्धेचा फिनाले



तरुणाईला व्यासपीठ देणा-या अविका एंटरटेनमेंटआयोजित फॅशन आयकॉन २०१९ सीजन-०२या सौंदर्य स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच संपन्न झाली. आयोजक त्रुशाली फदाले आणि सचिन फदाले हे या स्पर्धेचे आयोजक आहेत. या सौंदर्य स्पर्धेत मिस्टर गटात गौरव हजारे’, ‘मिस गटात गौरी टीकलेआणि मिसेस गटात श्रद्धा पोतदारविजेते ठरले.


माननीय श्री विजय शुक्ला VP लोकमत, डॉक्टर संजीव कुमार एसके ग्रुप, डॉक्टर दीपक बैंद मिस्टर हाउस आणि निर्माता दिग्दर्शक रवि जाधव आणि निर्माते सचिन नारकर अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत अविका एंटरटेन्मेंटच्या सौंदर्य स्पर्धेची अंतिम सोहळा शानदार पध्दतीने रंगला. मराठी चित्रपसृष्टीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे देखील स्पर्धेच्या अंतिम फेरी सोहळ्याला चारचाँद लागले.  

स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी ५०० स्पर्धकांनी नोंदणी केली होती. दोन निवड चाचण्यांतून काटेकोरपणे निवडलेले तीन गटातील ३६ स्पर्धक अंतिम फेरीत सहभागी झाले. अंतिम फेरीचं परीक्षण मिसेज़ ग्लोब इंडिया अभिनेत्री इलाक्षि गुप्ता (तानाजी मूवी फेम) , मिस नवी मुंबई कविता मिश्रा, निर्माता दिग्दर्शक रवी जाधव, निर्माता-दिग्दर्शक अभिनेता विजय पाटकर यानी केलं. अभिनेता अनिकेत विश्वासराव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अंतिम फेरीत गौरव हजारेविजेतेपदाचा मानकरी ठरला. श्रेयस पाटील फर्स्ट रनर अप’, ‘अमित मोहिते सेकंड रनर अपठरला. तसेच मिस गटात गौरी टीकलेविजेती ठरली तर कश्मिरा वेदक फर्स्ट रनर अपआणि पायल रोहेरा सेकंड रनर अपस्थानी राहिली. मिसेस गटात श्रद्धा पोतदारविजेतेपदाच्या मानकरी झाल्या. रुणाली पाटील आणि सुनीता प्रधान अनुक्रमे फर्स्ट रनर अप आणि सेकंड रनर अपया पारितोषिकांच्या मानकरी ठरल्या.
 
भानु डिझायनर व ३एम कलेक्शन घाटकोपर, सीझर नॉईस सलोन नवी मुंबई, यांच्याकडून विजेत्यांना एकूण ५ लाख रुपये पर्यंतची बक्षिसे तसेच द रोड हाउस ठाणे तर्फे लाईफटाईम फ्रि मेंबरशीप देण्यात आली. उत्तमोत्तम सादरीकरण, परीक्षकांचे विचार करायला लावणारे प्रश्न अशा जल्लोषमय वातावरणात अंतिम फेरी रंगली.


Comments

Popular posts from this blog

Mumbaikars kick off “Clean Shores” Drive at Versova Beach

सभी माओं को सुष्मिता सेन का संदेश: अब 'हाँ' अधिक बार कहिये

Oman Tourism Launches New “www.experienceoman.com” website