ग्रॅंड मराठा फाउंडेशनच्या माध्यमातून पांढरकरवाड्याच्या शेतकरी विधवांना दिसला आशेचा नवीन किरण

पांढरकरवाडा-यवतमाळ: ग्रॅंड मराठा फाउंडेशन (जीएमएफ) या खाजगी संस्थेने महाराष्ट्रातल्या शेतक-यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या आवश्यकता पूर्ण केल्या असून नुकतेच यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरवाडामध्ये शेतकरी विधवांसाठी मेळाव्याचे आयोजन केले होते.   
या मेळाव्याला 100हून जास्त शेतकरी विधवांनी उपस्थिती नोंदवली. यामध्ये मुख्यत्वे ग्रॅंड मराठा फाउंडेशनद्वारे हाती घेतल्या जाणा-या उपक्रमांना तसेच त्यांच्या उज्वल भविष्याची शाश्वती देणा-या संस्थेच्या भव्य नियोजनांना अधोरेखीत करण्यात आले. या व्यतिरिक्त स्वयं मदत गटाच्या काही सभासदांनी कौशल्य विकास कार्यक्रमाचा एक भाग म्हणून काही नवीनतम कृती सादर केल्या ज्यामुळे शेतकरी विधवांना प्रेरणा मिळाली. सौ. माधवी शेलाटकर, ट्रस्टी, ग्रॅंड मराठा फाउंडेशन यांनी ब्लॅंकेट्स व मिठाईसोबत या स्त्रियांना गहू,हरभरे आणि भाज्यांच्या बिया दिल्या.
या प्रसंगी बोलताना ग्रॅंड मराठा फाउंडेशनचे संस्थापक श्री रोहित शेलाटकर म्हणाले,”ग्रॅंड मराठा फाउंडेशन शेतकरी विधवांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या कठिणाईची जाणीव आहे. एक संस्था म्हणून आम्ही त्यांच्या सशक्ततेवर आणि सबळीकरणावर लक्ष केंद्रीत केले आहे, ज्यामुळे त्यांना स्वत:साठी अधिक चांगला चरितार्थ निर्माण करता येईल. शेतक-यांच्या आत्महत्येच्या घटना वाढत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या प्रियजनांच्या समस्यांना कमी करणे आता सर्वात जास्त महत्वाचे आहे. त्यांना स्वतंत्र तसेच स्वयंसिध्द करणे हे आपले अंतिम लक्ष्य आहे आणि आम्ही आमच्या उपक्रमांच्या मार्फत त्यांच्या आयुष्यांमध्ये सकारात्मक बदल करण्याची अपेक्षा करत आहोत.
या मेळाव्याला सुप्रसिध्द व्यक्तीमत्वांनी हजेरी लावली, ज्यात श्री सुरेशभाऊ बोलेनवार, जिल्हा परिषद सभासद, श्री मोरेश्वर वाटिले, शेतकरी नेते, सुश्री अपर्णा मालीकर, अध्यक्ष विदर्भ शेतकरी संघटना, श्री काशीनाथ मिलमिले, संचालक खरेदी विक्री संघ, श्री अंकित नाइतम, आदिवासी नेते आणि शेतकरी कार्यकर्ते तसेच विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष श्री किशोर तिवारी समाविष्ट होते.
महाराष्ट्रात 2013-2018च्या दरम्यान आरटीआय ऍप्लिकेशननुसार 15,356 शेतक-यांच्या मृत्यूंची नोंद केली गेली आहे, ज्यामध्ये विदर्भ क्षेत्रातली संख्या सर्वोच्च आहे. यवतमाळ आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये देखील शेतक-यांच्या आत्महत्या एक महत्वपूर्ण शेतकी समस्येच्या स्वरुपात वाढत आहेत. 2013मध्ये स्थापना झाल्यापासून फाउंडेशनने शेतक-यांचे, त्यांच्या विधवांचे आणि मुलांचे, सोबत महाराष्ट्रातल्या गरीब आणि उपेक्षित जनतेचे समर्थन करण्यासाठी निकराचे प्रयत्न केले आहेत.  
ग्रॅंड मराठा फाउंडेशनबद्दल: ग्रॅंड मराठा फाउंडेशन शेतक-यांना सर्वाभिमुखी शैक्षणिक पाठबळ देते, ज्यात योग्य किमती, सक्षम वितरण, आधुनिक तंत्रांचा समावेश होतो, यामुळे शेतक-यांना त्यांच्यासाठी अधिक चांगला चरितार्थ मिळवण्यात आणि कर्ज व गरीबीच्या दुष्टचक्राचे भेदन करण्यासाठी सबळता दिली जाते. विदर्भावर विशेष लक्ष केंद्रीत करत ग्रेट मराठा फाउंडेशन शेतक-यांच्या सबळीकरणासाठी वित्तसहाय्याची देखील मदत करते ज्यामुळे शेतकरी त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण देऊ शकतात तसेच ते शेतीसाठी पुरक असलेले उपक्रम राबवू शकतात. ग्रामिण क्षेत्रात समावेश होणा-या विधवा देखील त्यांचा चरीतार्थ मिळवू शकतात. त्यांनी शाळांना संगणकांचे अनुदान देण्यामार्फत ई लर्निंगची ओळख करुन दिली आहे आणि त्याला प्रोत्साहन देत आहेत.
शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांसाठीन चरितार्थाचे निर्माण करत व्यापक समाधाने उपलब्ध करुन देणे आणि कर्ज व गरीबीच्या दुष्टचक्रामधून त्यांना बाहेर काढणे हा ग्रॅंड मराठा फाउंडेशनचा उद्देश आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूरसारख्या भागात फाउंडेशन सक्रियपणे कार्यरत असून शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांच्या सर्वाभिमुखी विकास उपलब्ध करुन देत आहे. कार्यात्मक अडचणी कमी करुन शेतक-यांना भविष्यासाठी तयार करणे आणि अधिक चांगले आयुष्य जगण्याचे बळ देणे हा संस्थेचा मानस आहे.

Comments

Popular posts from this blog

Mumbaikars kick off “Clean Shores” Drive at Versova Beach

सभी माओं को सुष्मिता सेन का संदेश: अब 'हाँ' अधिक बार कहिये

Oman Tourism Launches New “www.experienceoman.com” website